नागोठणे ग्रामपंचायतीने उघड्या विहिरींवर लोखंडी झाकणे टाकून विहिरी सुरक्षित ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी
सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकूब सय्यद ∆
नागोठणे येथील आसिफ मुल्ला यांच्या घराच्या शेजारी कै.युसूफ उकये यांच्या घराच्या समोरील पाण्याची विहीर आहे ती विहीर ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असून त्या विहिरी ची उंची जमिनीपासून अवघ्या एक ते दीड फुटावर असल्याने व त्याच बरोबर ती विहीर उघडी स्वरूपाची असल्याने त्या विहिरीत उंबराचे झाड उगवले असून त्या झाडाची पाने खाण्यासाठी बकरीचे लहान कराडू हे त्या विहिरीच्या कठड्यावर चढतात. त्यामुळे त्यावेळी बकऱ्यांचा तोल सुटल्याने थेट विहिरीमध्ये पाण्यात पडल्याचे अनेक वेळा तेथील स्थानिक लोकांना पहावयास मिळाले आहे.
मात्र त्या ठिकाणी त्वरित विहिरीजवळ लोकांनी धाव घेऊन त्या बकऱ्यांना काढल्यामुळे सुदैवाने त्यांची जीवित हानी झाली नाही. परंतु जमिनीपासून विहीरची उंची कमी असल्याने एखादे लहान मूल त्याचं वय 4 वर्ष किंवा दोन वर्षाचा असेल तर तो लहान मुलगा त्या विहिरीचे पाणी बघण्यासाठी गेला असता जर त्याचा तोल गेला तर तो लहान बालक थेट विहिरीमध्ये पडून त्याची जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशा उघड्या विहिरी मुळे मुक्या प्राण्यांचा त्याचबरोबर लहान मुलांचा बळी जाऊ शकतो. त्यामुळे नागोठणे ग्रामपंचायतीने या उघड्या विहिरींकडे लक्ष केंद्रित करावे त्या विहिरींवर लोखंडी असे झाकण बनवून त्या विहिरीला संरक्षण जाळी बनवून प्राण्यांचे त्याच बरोबर लहान मुलांचे जीवितास होणारे धोके टाळावे अशी स्थानिक स्थानिकांकडून जोरदार मागणी होत आहे.








Be First to Comment