पाटबंधारे विभागाने नदीच्या खांडी न भरल्याने गोवे गावाला पाण्याचा वेढा
भात शेतीचेही नुकसान नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
गेले चार दिवस पडत असलेल्या तुफान पावसाच्या फटकेबाजीमुळे रोहा तालुक्यातील कोलाड परिसरातून जाणाऱ्या सर्वच नद्या ह्या दुथडी भरून वाहू लागल्या असून या सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून या परिसरातुन जाणारी माहीसदरा नदिनी धोक्याची पातळी ओलांडली असुन या पुराच्या पाण्यामुळे नदीला पडलेल्या खांडीमुळे कोलाड परिसरातील गोवे गावाला पाण्याचा वेढा बसलेला असून येथील नागरिकांना प्रशासनकडुन सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
गेली चार दिवसापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोलाड परिसरासह रोहा तालुक्यातील कुंडलिका,तसेच महिसदरा व गोदी या उपनद्या यांनी धोक्याची पातळी ओलांडली असुन गोवे गावाजवळून जाणाऱ्या महिस दरा नदीला अनेक वर्षापासुन खांडी पडलेल्या या खांडीमुळे संपूर्ण गोवे गावाला पाण्याने वेढलेले असुन गावातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले असुन रस्ता बंद झाला.अनेक वेळा कोलाड पाटबंधारे विभागाकडे खांडी बांधण्यासाठी ग्रामस्थांनी अर्ज केला परंतु त्याकडे पाटबंधारे खात्याने दुर्लक्ष केले.
या नदीच्या दोन्ही बाजूने महिसदरा नदी पुलापासून ते मूठवली धरण या ५किलोमीटरच्या अंतरावर स्वरक्षण भिंत व भराव बांधणे आवश्यक आहे.परंतु हे काम न केल्याने या नदीला जागजागी खांडी गेल्या आहेत.यामुळे या खांडीमुळे पुराचे पाणी शेतीत घुसले शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असुन जर दोन दिवस पाऊस असाच पडत राहिला तर येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होईल अशी भिती शेतकरी वर्गातुन व्यक्त केली जात आहे.
कोरोनामुळे हैराणझालेल्या नागरिक त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाचा फटका यामुळे सावरून शेतकरी वर्गाने आपली भात शेतीची पेरणी ही केली.नंतर भातलावणीला पूरक पाऊस झाल्याने भात लावणी ही वेळेवर झाल्याने पीक चांगले येणार असेच वाटत असतांना चार दिवस सतत पडलेल्या पावसाने संपूर्ण शेती पाण्याखाली गेली असुन पाऊस दोन दिवस असाच पडला तर भातशेती मोठया प्रमाणात नुकसान होईल.असे बोलले जात आहे.






Be First to Comment