Press "Enter" to skip to content

प्रायमा असोसिएशनच्यावतीने कर्करोग निदान शिबिर

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

रसायनीतील डाॅक्टरांनी एकत्र येऊन प्रायमा असोसिएशनची स्थापना केली आहे.या डाॅक्टर असोसिएशनकडून ठिकठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी मोफत आरोग्यविषयक शिबिर,विविध आजारांवर मार्गदर्शन, मोफत औषधोपचार आदी कार्य केले जाते. याचाच एक भाग म्हणून पनवेल खांदा काॅलनीत मुंबई अनकाॅलॉजी सेंटर व प्रायमा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्करोग निदान शिबिर पार पडले.

या शिबिरात स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग यांचे निदान मोफत करण्यात आले. या शिबिरात स्तन कर्करोगसाठी तीस व गर्भाशय मुखासाठी सदोतीस स्त्रियांची तपासणी केली.

यावेळी प्रायमा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ संजय कुरंगळे , डॉ गजानन पाटील, डॉ अमित चव्हाण,डॉ संगीता जैन,डॉ लेखा उचील,डॉ रश्मी बागडे यांनी कर्करोग तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना आजाराविषयी मार्गदर्शन केले.हे शिबिर मु़ंबई आॅनकोलाॅजी सेंटरचे डॉ देवेंद्र पाल यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले.कर्करोग शिबिराने नागरिकांना आपल्या आजारपणाची माहिती मिळाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.