सिटी बेल ∆ पनवेल ∆
विजय आर्मी स्कूल मध्ये आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे प्राचार्य मराठे सर यांनी भूषविले. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून कमांडर पीव्हीआर कृष्णन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास पाटील सर यांनी केले तर प्रास्ताविक श्रीमती नेरुळकर मॅडम यांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी भाषणे व पोवाडे मध्ये भाग घेतला.
त्याचबरोबर लांबोळे सर व बिराडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सांगता अध्यक्षीय भाषणाने झाले व कार्यक्रमांमध्ये आभार प्रदर्शन श्रीमती मोरे मॅडम यांनी केला.








Be First to Comment