Press "Enter" to skip to content

गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलची कामगिरी

तडीपार असलेल्या गुन्हेगारास चोरीच्या मोटारसायकलीसह केले गजाआड

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

नवी मुंबई, रायगड व ठाणे शहरे व जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलच्या पथकाने गस्त घालत असताना खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरातून चोरीच्या मोटारसायकलीसह जेरबंद केले आहे.

गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, पोलिस हवालदार तुकाराम सुर्यवंशी, पोलीस शिपाई भोपी हे पनवेल हद्दीत गुन्हे प्रतिबंध गस्त घालत असताना खांदेश्वर रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलवरून फिरताना आढळून आल्याने त्याला घेराव घालून जागीच पकडून त्याची विचारपूस केली असता तो सध्या हद्दपार असलेला गुन्हेगार मसूद उर्फ मक्सुद अहमद सय्यद (वय-२६, रा.-कळंबोली) असे निष्पन्न झाले.

तसेच त्याच्याकडे असलेली मोटारसायकल क्र- एमएच ४६ एएन ९३९८ ही त्याने पनवेल शहरातील सावरकर चौकातील एका इमारतीच्या पार्किंगमधून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.