सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
नेहमीच समाजसेवेत अग्रेसर असणारे पेण येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे उर्फ डिके यांच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त पेण तालुक्यातील एक हजार तरुण-तरुणींना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या इन्श्युरन्स वाटप कार्यक्रमाचे आयोजन 1 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजता आगरी समाज हॉल पेण येथे करण्यात आले आहे.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, साहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, हिरवळ प्रतिष्ठान संस्थापक किशोर धारिया, जे.एम.इन्फ्रा कंपनीचे डायरेक्ट विजय म्हात्रे, जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, दादर सागरी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील, समाजसेवक अण्णा कडू, साधना कांबळे आदी मान्यवर दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त इन्श्युरन्स वाटप कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
समाजसेवक दत्ता कांबळे यांनी आत्तापर्यंत मोटारसायकलस्वारांना मोफत हेल्मेट वाटप, आदिवासी शाळांना पिण्याचे पाण्याचे फिल्टर वाटप, कोरोना काळात व्हिटॅमिन सी गोळ्या वाटप, अन्नधान्य वाटप, वाहतूक पोलिसांना लाईफ जॅकेट वाटप, विद्यार्थ्यांना वह्या वाटप, महाड व कोल्हापूर पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, उपविभागीय पोलीस कार्यालय व अंतोरे फाटा येथे स्वखर्चाने हायमास्ट लावणे, पेण मधील पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप, सापोली व वरेडी गावातील पुरात वाहून गेलेला रस्ता बनवून देणे, कोरोना काळात अंतोरे फाटा येथे जिल्ह्यातील पहिला सॅनिटायझर कक्ष बांधणे, पेण येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा आदींचे नियोजन केले होते.
समाजसेवक दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार तरुण-तरुणींना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या इन्श्युरन्स वाटप कार्यक्रम 1 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजता आगरी समाज हॉल पेण येथे होणार असून वक्रतुंड मित्र मंडळाचे सर्व सदस्य विशेष मेहनत घेत आहेत.








Be First to Comment