Press "Enter" to skip to content

शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद..

सुनिल गोगटे यांच्या जनसेवा कार्यालयात बूस्टर डोस लसीकरण शिबिर संपन्न

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

भारतीय जनता पार्टी कर्जत आणि उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानाने बूस्टर डोस लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 110 जणांनी लसीकरण करून घेतले.

नागरिकांना लसीकरण सहजतेने करता यावे हे उद्दिष्ट समोर ठेवून सुनिल गोगटे यांनी आपल्या जनसेवा कार्यालयात शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे कोकण संपर्क प्रमुख सुनिल गोगटे, कर्जत तालुका सरचिटणीस संजय कराळे, नगरसेवक बळवंत घुमरे, मारुती जगताप, दिनेश गणेगा, श्रीनिवास राव,तालुका विद्यार्थी संयोजक अभिषेक तिवारी, युवा मोर्चा चिटणीस सर्वेश गोगटे, प्रणव पाटील, मिनेश मसणे, बिराज पाटकर, राजेश थत्ते, विलास पाटील, दर्पण घारे, नंदू टिळक, तालुका महिला अध्यक्ष स्नेहा गोगटे, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष ॲड.प्रीती तिवारी, सोनिया गरवारे, श्वेता वैद्य, केतकी कुडे, पूनम डेरवणकर,ज्योती कडू आदी उपस्थित होते.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका शिल्पा जाधव, नगरपरिषदेचा संकेत पाटील, विजय भगत यांनी लसीकरण केले. कोविशिल्ड-90 व कोव्हॅक्सिन- 20 अश्या एकूण 110 जणांनी बूस्टर डोस चे लसीकरण करून घेतले.

सर्व नागरिककाचे अगदी सहजतेने लसीकरण झाले म्हणुन नागरिक खुष होते पुढे अजुन लसीकरण शिबीरे करावे अशी मागणी नागरिकांनी याप्रसंगी केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.