अध्यक्षपदी ह.भ.प.रामदास महाराज पाटील तर कार्याध्यक्षपदावर ह.भ.प.मारूती महाराज कोलाटकर

सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
अखिल वारकरी संघाच्या कोकण विभाग अध्यक्षपदी खालापूर तालुक्यातील खानाव येथील जेष्ठ किर्तनकार व प्रवचनकार रायगड भूषण ह.भ.प.रामदास महाराज पाटील यांची तर रोहे तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली गालचे युवा किर्तनकार व समाजप्रबोधनकार रायगड भूषण ह.भ.प.मारूती महाराज कोलाटकर यांची कार्याध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
आळंदी येथे अखिल वारकरी संघ राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानु मते कोकण विभाग अध्यक्ष पदावर ह.भ.प.रामदास महाराज पाटील (भाई महाराज) कोकण विभाग कार्याध्यक्ष पदी ह.भ.प.मारूती महाराज कोलाटकर यांची निवड करून तशाप्रकारचे नियुक्तीपञ त्यांना देण्यात आले आहे. त्या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.मच्छिंद्र महाराज धानेपकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष गोविंद महाराज गोरे, राष्ट्रीय सचिव संजय महाराज हिवराळे,राष्ट्रीय खजिनदार प्रविण महाराज लोळे पाटील,राष्ट्रीय कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जाधव,राष्ट्रीय कोषाध्यक्ष यशवंत महाराज फाले,राष्ट्रीय संघटक पांडुरंग महाराज शितोळे शास्ञी,राष्ट्रीय सल्लागार आत्मारामजी शास्ञी महाराज,राष्ट्रीय प्रचार प्रमुख लक्ष्मण महाराज पाटील, राष्ट्रीय सदस्य सतीश आण्णा,राष्ट्रिय प्रवक्ते तुकाराम महाराज मुंडे शास्ञी, प्रदेश प्रवक्ते संतोष महाराज आढावणे,सोपान महाराज सानप शास्ञी,मराठवाडा विभाग अध्यक्ष निरंजन भाईजी महाराज,मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आक्रुर महाराज साखरे आदी सांप्रदायातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
ह.भ.प.रामदास महाराज पाटील व ह.भ.प.मारूती महाराज कोलाटकर यांच्या या निवडीबद्दल समस्त रायगड जिल्हा वारकरी सांप्रदाय व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्या वतीने अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे.






Be First to Comment