सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
शिवसेना पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. उरण तालुक्यातही विविध सामाजिक उपक्रम राबवून उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेनेतर्फे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

यावेळी द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेतर्फे एम एस ई बी हायस्कूल येथे शाळेतील विद्यार्थीना वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील, द्रोणागिरी युवा अधिकारी करण पाटील, महिला कार्यकर्त्या सुरेखा भोईर उपस्थित होत्या.द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून नेहमी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. असे गौरवोदगार एम एस ई बी मधील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कवळसे मॅडम यांनी काढले. व चांगला उपक्रम राबविल्याने शिवसेनेचे आभार मानले.








Be First to Comment