अतिवृष्टीच्या काळात घराबाहेर पडू नये… जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे जनतेला आवाहन
सिटी बेल लाइव्ह / रायगड:धम्मशिल सावंत #
रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने अतिवृष्टी चा इशारा दिला असून मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंबा, सावित्री, भोगावती, काळ, उल्हास अशा महत्वाच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक तालुक्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे जनतेला आवाहन केले आहे.






Be First to Comment