Press "Enter" to skip to content

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचा अभिनव उपक्रम

उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून “संडे टू संडे” ऑपरेशन अंतर्गत 9 मुलांचं ऑपरेशन

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून संडे टू संडे उपक्रमा अंतर्गत 9 चिमुकल्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

गोरगरीब विशेषतः आदिवासी भागातील मुलांना गंभीर आजार असतील व या गंभीर आजारांवर शस्त्रक्रिया करणे सर्वांना शक्य नसते, ही प्रक्रिया खर्चिक असल्याने गोरगरिबांना याचा खर्च परवडण्याजोगा नसतो, त्यामुळे अंगणवाडीसेविकांच्या माध्यमातून अशा मुलांचा शोध घेऊन, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येते.

Coming soon …

ही शस्त्रक्रिया कॅम्पमध्ये करणे शक्य नसल्याने त्यांना सायन रुग्णालय व ठाण्यातील रुग्णालयात नेण्यात येते.

पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयात अशा 9 मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती बाल रुग्ण शल्यचिकित्सक डॉ.संजय ओक, डॉ.राकेश शहा तसेच रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.