Press "Enter" to skip to content

पनवेल परिसरात गुटखा विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆

प्रतीबंधित अन्नपदार्थ गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू ची विक्री करणाऱ्या दोघांजणाविरुद्ध अन्न व सुरक्षा पथकाने व तसेच पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे .

शहरातील मॉर्डन स्वीट्सच्या बाजूला असलेल्या अनिल पान शॉप व निर्दोश पान शॉप या ठिकाणी बेकायदेशीररित्या प्रतीबंधित अन्नपदार्थ गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू ची विक्री करत असल्याची माहिती अन्न व सुरक्षा पथकाला मिळताच अधिकारी विक्रम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून अजित सिह ( वय ३४ ) , व निर्दोशकुमार साहू ( वय ४२ ) या दोघांना ताब्यात घेऊन त्याच्या कडून जवळपास २२१२ /- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे . या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.