Press "Enter" to skip to content

फोनमधील फोटो प्रसारीत करण्याची धमकी

रसायनी वावेघरमध्ये तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून ठेवले शारिरीक संबंध

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

रसायनी वावेघर येथील एका तरुणाने प्रेमसंबंध करत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारिरीक संबंध ठेवल्याची घटना रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

याबाबत रसायनी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वावेघर येथील लक्ष्मण सिताराम चव्हाण (वय 26) याने गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून व त्याचे मोबाईल फोनमधील फोटो प्रसारीत करण्याची धमकी देवून मोहोपाडा येथील गुडलक लाॅजवर घेवून जाऊन तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध केले आहेत.तसेच मागील दिवाळीच्या सणावेळी तरुणीस गुडलक लाॅज येथे मारहाण करून वावेघर गावात आरोपी व फिर्यादी यांचे प्रेमसंबंध, शारिरीक संबंध ठेवल्या बाबतची बदनामी केली.

याप्रकरणी फिर्यादीने आईं व नातेवाईक यांच्यासोबत चर्चा विनिमय करून याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याबाबत लक्ष्मण सिताराम चव्हाण (वय 26) यांच्याविरोधात रसायनी पोलिस ठाण्यात भादवि कलम 376,376(2),(एम)500,506,323 गुन्हा नोंद झाला असून रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे अधिक तपास करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.