Press "Enter" to skip to content

कासपमध्ये चायनीजवर सिगारेट दिले नाही म्हणून एकावर प्राणघातक हल्ला

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी परिसरातील कासप गावच्या हद्दीतील श्रेयाभाईं चायनीज येथे धशीखालील जांभिवली येथील वैभव देवराम कोंडीलकर (वय 30) व त्याचा मित्र हे जेवण करण्यासाठी बसले असताना शेजारीच बसलेल्या कासप येथील संतोष माळी(वय 35) याने वैभव कोडींलकर यांच्याकडे सिगारेट मागितले.यावेळी वैभवने नकार दिला असता त्या गोष्टीचा राग मनात धरून संतोष माळी याने वैभव कोडींलकर यास शिविगाळी करुन हाताबुक्याने मारहाण केली.व चायनीज दुकानातील डब्याची कडी डोक्यात मारुन दुखापत करुन धमकी दिली.

यानंतर वैभवच्या डोक्यातून रक्तश्राव होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार जयवंत अशोक बैकर तपास करीत आहेत.याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून आरोपी संतोष माळी यांच्याविरोधात भादंवि कलम 324,323504,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.