Press "Enter" to skip to content

भरधाव एस टी बसची उभ्या ट्रेलर ला धडक

बस चालकाचा मृत्यू ; १९ प्रवाशी जखमी

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

पनवेल जवळील एक्स्प्रेस महामार्गावर मध्यरात्री अडीचच्या सुमारास उभ्या ट्रेलर ला पाठिमागुन आलेल्या भरधाव एस टी बस ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एस टी बस चालकाचा गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाला आहे तर बस मधील १९ प्रवाशी जखमी झाले असून त्यांना कामोठे एम जी एम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे .

सोलापूर येथून अर्नाळा विरार या ठिकाणी एस टी बस क्रमांक एम एच ०९ इएम ९६४१ ही घेऊन बस चालक अशोक गायखे ( वय ३३ ) , रा. उस्मानाबाद हा चालला असताना पनवेल पनवेल जवळील एक्स्प्रेस महामार्ग क्रमांक १०/ ५०० च्या हद्दीत ट्रेलर क्रमांक एम एच ४६ ए एफ २८६४ हा उभा होता त्याला या एस टी बस ची पाठीमागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात बस चालकाचा गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाला आहे तर बस मधील १९ प्रवाशी जखमी झाले असून त्यांना कामोठे एम जी एम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे .

या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलिसांचे पथक , आयआरबी चे गस्त पथक , पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात उपचारार्थ पाठविले तसेच अपघात गस्त वाहनांना बाजूला करण्यात आले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.