आज शेतकऱ्यांच्या पीक कर्जासह विविध प्रश्नावर शेकापचे अन्नत्याग आंदोलन
सिटी बेल लाइव्ह / बीड (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका व बीड जिल्हा मध्यवर्ती बँक पिक कर्ज देण्यासाठी जाणीवपूर्वक विलंबा सह, टाळाटाळ करत असून, ना हरकत प्रमाणपत्र शक्तीचे करत असल्याने, शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित राहावे लागत आहे. स्टेट बँक ऑफ हैदराबाद,भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा आदी बँकांनी असला तरी अद्याप दहा टक्के देखील पीक कर्ज वाटप केले नाही. परंतु या बँका शेतकऱ्यांना कागदपत्र च्या नावाखाली विनाकारण चकरा मारायला लावत असून संकटात सापडलेला शेतकरी बँकेत फाईल दाखल करून सुद्धा पिकांना खुरपणी,खत, फवारणी पैस्या आभावी करू शकत नसल्याने चांगला पावसाळा असून देखील पिके हातची जाण्याच्या मार्गावर आहेत.
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या बी-बीयानांच्या कंपन्याकडून हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी व वयोवृद्ध आज्ञान शेतकऱ्यांना पीक देखील कर्ज वाटप करण्यात यावे.बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखांमध्ये कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी,ज्या शेतकऱ्यांना मागील वर्षी कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज माफी द्या ,आदी मागण्यांसाठी बीड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाभर अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे, या आंदोलनामध्ये बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय, माजलगाव, व जिल्ह्यातिल सर्व तहसील कार्यालयासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या विविध मागण्यांसाठी आज 6ऑगस्ट रोजी एक दिवसीय सकाळी 10 ते 4 वाजे पर्यंत अन्नत्याग आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनामध्ये कोरणा संकटाचे पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवून व काळजी घेऊन हे आंदोलन करण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलन असल्याची महीती शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई मोहन गुंड,भाई अॅड. नारायण गोले पाटील, भाई अॅड.संग्राम तुपे,भाई सौरव संगेवार भाई भीमराव कुटे,भाई दत्ता प्रभाळे,भाई अशोक रोडे, भाई प्रवीण खोडसे, लखन सोळुंके यांच्यासह आदींनी केले






Be First to Comment