सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १० जण सापडले आहेत. ३२ जणांना घरी सोडण्यात आले तर ३ जण मयत झाले आहेत. आज एकूण पॉझिटीव्ह ९३५, उपचार करून बरे झालेले ७४९, उपचार घेणारे १५२, मयत ३४ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज केगाव आवेडा १, रांजणपाडा जासई १, जेएनपीटी ३, गणेश कृपा नवीन शेवा १, विंधणे १, आवरे १, पागोटे १, दादारपाडा १ असे एकूण १० जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. चिरले १, केगाव २, दिघोडे १, पिरकोन १, नवीन शेवा १, जासई रेल्वे कॉलनी १, उरण ८, मोरा कोळीवाडा १, जेएनपीटी १, तांडेल नगर करंजा १, द्रोणागिरी १, विंधणे १, नवघर २, सावरखार १, जासई १, सोनारी १, डोंगरी २, बोकडविरा १, फुंडे १, नागाव १, मुळेखंड १ असे एकूण ३२ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर पाणजे १, मोरा १ व जासई १ असे ३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
बदलत्या वातावरणाचा फटका बसत कोरोना पॉझिटीव्हचा आकडा उरणमध्ये वाढताना दिसत आहे. त्यामुळे उरणच्या जनतेने कोरोनाला घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेऊन यशस्वीपणे सामना करणे आवश्यक बनले आहे.






Be First to Comment