मुंबई- गोवा महामार्गावरील वाहनचालकांना मोठा फटका
सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे)
अतिवृष्टीचा फटका महाराष्ट्रासह पेण तालुक्याला मोठ्या प्रमाणावर बसला असुन दिवसभर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर चिखलाचे पाट वाहत आहे त्यामुळे या महामार्गावरील वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने वाहनचालकांना मोठा फटका बसला आहे.प्रशासनाने खाडीकिनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
आजच्या मुसळधार पावसाने पेण तालुक्याला चांगलाच झोडपला असून शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. मागील 48 तासांपासून रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडत असून या पावसाचा फटका मुंबई – गोवा हायवेला बसला आहे. या महामार्गावर अक्षरशः चिखलाचे पाट वाहू लागले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांची चाळण झालेली पाहायला मिळत आहे. या खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास रुग्ण नेणाऱ्या रुग्णवाहिका आणि दुचाकी स्वरांना बसत असून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.






Be First to Comment