Press "Enter" to skip to content

अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील चाळे ; ५० वर्षीय नराधमावर गुन्हा दाखल

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆

एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तोंड रुमालाने बांधून तिच्या शरीराशी अश्लील चाळे करणाऱ्या एका ५० वर्षीय इसमाविरुद्द खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खारघर सेक्टर १० पाण्याच्या टाकीजवळील झोपडपट्टीत राहणारी ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी हि घरी एकटी घरात असताना त्यांच्या बाजूला राहणारा ५० वर्षीय आरोपी नूर अनारुल हुसेन ने तिच्या घरात येऊन तिच्या तोंडाला दाबून जबरदस्तीने उचलून घेऊन स्वतःच्या घरी आणून तिच्या तोंडाला रुमालाने बांधून सदर आरोपीने स्वतःचे तसेच सदर मुलीचे कपडे काढून तिच्या शरीरावर हात फिरवून तिचे चुंबन घेतल्याने या बाबतची तक्रार खारघर पोलिसाने पोलीस ठाण्यात देण्यात आली.

या घटनेची तात्काळ दखल घेत त्याच्या विरुद्द भादवि कलम ३६३ सह बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ८ व १० अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.