Press "Enter" to skip to content

नागेंद्र म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा

सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्य सुयश क्लासेस आवरे तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

सिटी बेल ∆ पाले उरण ∆ अजय शिवकर ∆

मिळालेल्या आयुष्याला सतकर्मी घालूवून पुण्याचा साठा करत राहिलो तर , आज केलेली कर्मे उद्याचा काळ चांगला की वाईट ठरवत असतात .
आयुष्य हे क्षणभंगुर आहे , प्रत्येक क्षणात जर आपण इतरांच्या कामी आलो तर नक्कीच भगवंत याचे अप्रत्यक्ष मोजमाप करत असतो. सारडे विकास मंचाचे अध्यक्ष कोमना देवी ऑक्सिजन पार्क चे सर्वेसर्वा नागेंद्र म्हात्रे सर यांचा वाढदिवस हा रा. जि. प शाळा पाले येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणजे वह्या , पेन कंपास मधील साहित्य तसेच चित्रकलेचे रंगीत खडू वाटप असे शैक्षणिक साहित्य वाटप करून शालेय परिसरात फुल वृक्षाचे वृक्षारोपण करून साजरा करून सर्वांसमोर एक आदर्श समोर ठेवला. ग्रामीण भागात असूनही सामाजिक स्तरावर हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या प्रसंगी रा. जि. प .शाळा पाले मधील विद्यार्थी हे गुणी आहे त व कमालीची शिस्त आहे हीच शिस्त राष्ट्र घडवीत असते विद्यार्थ्यांनि शिक्षणाची कास धरावी असे प्रतिपादन पाले गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष प्रशांत म्हात्रे यांनी केली व कार्यक्रम चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, शाळेतील विद्यार्थ्यांनि आपलं लक्ष हे फक्त अभ्यास तसेच शिक्षण पूरक उपक्रम तसेच क्रीडा क्षेत्रात सुद्धा नाव करावे तसेच शेखर म्हात्रे सर यांनी या वेळी बोलताना म्हटले की वाढदिवसाचा अनोखा आदर्श हा रा जि प शाळा पाले येथे साजरा करून निर्माण केला व विद्यार्थ्यांना निखळ आनंद दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटन वाढदिवस मूर्ती श्री नागेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते व विविध मान्यवर यांच्या हस्ते झाले .

या कार्यक्रमा प्रसंगी सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर समाधान म्हात्रे ( आवरे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच) शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष श्री मेनन म्हात्रे , सुरेंद्र म्हात्रे , महिला सदस्या दर्शना म्हात्रे योजना म्हात्रे मिताली म्हात्रे , अमित म्हात्रे, प्रशांत म्हात्रे (तंटा मुक्ती अध्यक्ष) विद्यालयाचे मुख्याद्यपक उपेंद्र ठाकूर सर , राणिता म्हात्रे मॅडम सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष निवास गावंड सर, शेखर म्हात्रे सर सारडे विकास मंच चे कार्याध्यक्ष रोहित पाटील , सह सचिव मंगेश पाटील, शंकर पाटील ,हरिष म्हात्रे , अरुण कडू, सानिका गावंड , मधवी गावंड रामनाथ पाटील , स्नेहीत पाटील श्रीवेद म्हात्रे हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद म्हात्रे यांनी केले व आभारप्रदर्शन हे शाळेचे मुख्याध्यापक उपेंद्र ठाकूर सर यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.