सिटी बेल ∆ उरण ∆ सुनील ठाकूर ∆
येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय महालन विभाग फुंडे येथे राष्ट्रीय सेवा योजना व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने सी.के. टी. कॉलेज, पनवेल येथील डॉ. बाळासाहेब पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी जागतिक लोकसंख्या, आपल्या देशाची आर्थिक स्थिती, शैक्षणिक व्यवस्था यांचा परामर्श घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्यडॉ.पी.जी. पवार हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.श्रीकांत गोतपागर यांनी केले यांनी केले. डॉ.रत्नमाला जावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रा.सी.डी.धिंदळे यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास उपप्राचार्य, ,डॉ.विलास महाले, प्रा.राम गोसवी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.







Be First to Comment