Press "Enter" to skip to content

श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे गुरुपौर्णिमा हर्षोल्हासात साजरी

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.

सकाळी अभिषेक,दत्त याग, तसेच दुपारीआरती, महाप्रसाद व मठाचे मठाधिपती स्व. दादा दरेकर यांचे ज्येष्ठ पुत्र विक्रांत दरेकर नित्यनेमाने सेवा करणा-या वत्सला वांजळे,विजु दरेकर, नितीन चिंदरकर,निलेश सुर्वे,महेश कानिटकर,आदीं सेवेक-यांचा तसेच खजिनदार भानू काका शिंदे,महाप्रसाद बनविणारे आचारी शंकर पवार, सखाराम पवार, मठ परिसर स्वच्छ ठेवणारे स्वच्छता दुत, तसेच कर्मचारी दिलीप पांडे, दादू दरेकर, सदानंद लोखंडे, देवेंद्र तांबे,आदींचा गुरुपौर्णिमा अन्नदान मित्र परिवाराच्या वतिने कृतज्ञतापूर्वक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

2004 सालापासून गुरुपौर्णिमा अन्नदान मित्र परिवाराच्या वतिने प्रतिवर्षी मठात महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.गेली दोन वर्षे कोविड महामारीच्या संकटामधे शासनबंदीमुळे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली नव्हती, त्यामुळे काल धुवाधार अतिवृष्टी असूनही मोठ्या प्रमाणात स्वामी भक्तांनी दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला.

याप्रसंगी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, माजी नगरसेविका अरुणा वायकर यांंना शाल श्रीफळ देण्यात आले. याप्रसंगी वकील राजेंद्र निगुडकर, राजू पोतदार, अशोक शितोळे, दिपक कुलकर्णी, सचिन दरेकर, प्रमोद दानवे, मंगेश शिंदे, सुभाष पाटील, तसेच मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.