सिटी बेल लाइव्ह / रोहा (शरद जाधव)
रोहा तालुक्यातील खांब ग्रा.पंचायत हद्दीत २ नवे कोरोना रूग्ण आढळल्याने विभागातील रहिवासी वर्गाचीही चिंता वाढली आहे.
विभागातील खांब साई नगर येथे २ नवे रूग्ण मागील चार दिवसात विभागात भितीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.यामध्ये ५४ वर्षीय पुरूष व ९० वर्षीय महिलेचा समावेश आहे.मुंबई गोवा महामार्गावर खांब हे नाक्याचे ठिकाण आहे. ठिकाणि बाजारपेठ आहे त्यामुळे आजूबाजुच्या परिसरातील लोक या ठिकाणी बाजारहाट करण्याकरिता येत असतात.या विभागात कोरोनाने शिरकाव करु नये म्हणून विभागातील ग्रामपंचत प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती.अंनेक वेळ बाजारपेठ बंद देखील ठेवण्यात आली होती.तालुक्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण सापडले होते परंतू खांबमध्ये कुठलाही रूग्ण अढळला नाही अखेर कोरोनाचा अटकाव करण्यात शर्तीचा प्रयत्न करुन देखील कोरोनाचे २ येथे रुग्ण आढळले. एकास मुंबई येथे तर दुसरा व्यक्तीला यास रोहा येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबियांची कोरोनो चाचणी करिता नमुने नेण्यात आले आहेत.येथे कोरोना रूग्ण आढळले मुळे खांब परीसरात घबराट पसरली आहे.
ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे अणि पुर्वीचा आजार आहे अशा व्यक्तीला कोरोना जीवघेणा आजार ठरत आहे.त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे या आजारात माणसाची शरीरातील ओक्सीजन शमता कमी होते व माणुस दगावन्या ची शक्यता असते म्हणूण शासकिय दवाखाण्यात उपचार घेणे गरजेचे आहे सर्दी ताप खोकला हे आजार अंगावर नेऊ नये.येथे आढळलेल्या सदर व्यक्तीचे घर सील करण्यात आले आहे या विषयी माहिती देताना स्थनिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ग्राम पंचायत पदाधिकारी मनोज शिर्के यानी साई नगर परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे या ठिकाणी रूग्ण अढळले आहेत या करिता तेथील नागरिकांना स्वत:च्या सूरक्षेची काळजी घ्यावी असे अवाहान ग्रा.पंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.तर पाँझिटिव्ह रूग्णांची प्रकृती सुधारत असल्याचेही त्यानी संगितले आहे.






Be First to Comment