कोलाड-रोहा रस्त्यावर पाणीच पाणी..
दुकानात पाणी शिरूर मोठया प्रमाणात नुकसान
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
गेली दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसात कोलाड आंबेवाडी येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली असुन येथील व्यवसायिक दुकानदार व काही वस्तीत पुराचे पाणी घुसले आंबेवाडी जवळपास रोहा कोलाड मार्गावर पाणी भरल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती तसेच छोटे मोठे व्यवसायिकांच्या दुकानात पाणी शिरुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेचे संकेत मिळत आहेत,
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी रक्षाबंधन पौर्णिमेला दुपारपासूनच पावसाने हजेरी लावली तर मंगळवार पासून त्याचे अधिक चित्र बदलत रोहा तालुक्यासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाने झोडपत सलग तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोलाड आंबेवाडी स्टॉप नजीक पूर परिस्थिती निर्माण होऊन वस्तीत व काही व्यवसायिक दुकानदार यांच्या दुकानात पाणी शिरले तर कोलाड रोहा मार्गावर तीन ते चार फूट पाणी साचल्याने काहीशी वाहतूक कोंडीवर त्याचा परिणाम झाला.
मुबंई गोवा महामार्गाच्या कामाच्या गळथान कारभारामुळे व नाले कामांच्या दिरंगाई या पूरपरिस्थितीचा फटका हा कोलाड रोहा मार्गालगत असलेल्या वस्ती धारक तसेच येथील व्यवसायिक दुकानदार यांना झाला असल्याचे बोलले जात आहे कोलाड ते आंबेवाडी मार्गावर अनेक छोटे मोठे व्यवसायिक व्यवसाय करत आहेत यात काही किराणा दुकान,कपडे व्यवसायिक,गॅरेज, चिकन मटण वाले तर काही भाजीवाले यांची दुकाने या मार्गावर मोठया प्रमाणात आहेत मात्र गेली तीन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसात काहींच्या दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
आंबेवाडी वस्तीधारकांना हा प्रथच या पुराच्या पाण्याचा फटका बसला असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे मुबंई गोवा महार्गाच्या चौपदरी कारणाचे भरावयाचे काम तसेच रेल्वे दुपद्रीकरणाचा भरवामुळे गोदी नदीपात्र व कुंडलिका नदीपात्रात जाणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण झाल्याने हे पाणी कोलाड रोहा मार्गावर आले असल्याचे आंबेवाडी वस्तीतील नागरिकांकडून बोलले जात आहे.






Be First to Comment