Press "Enter" to skip to content

संदिप मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजउपयोगी उपक्रम

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #

जनसामान्यांच्या शब्दाला आधार देऊन त्यांच्या समस्येचे सहजतेने समाधान करून प्रेम देणारा अशी रसायनी परीसरात ख्याती असलेले माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या विविध समाजोपयोगी प्रयत्नातून गरीब,गरजू, सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.

महागाई वाढत असताना मुलांचे शिक्षण कसे करावे, त्याचबरोबर लग्न कसे होईल यांच विचारांतून मुलांचे पालक चिंताग्रस्त असतात, मात्र यावरही माजी सरपंच संदिप मुंढे यांनी उपाययोजना करुन सामुदायिक लग्न सोहळा लावून देण्याची संकल्पना विचारांत आणली. शिवाय त्यांनी अनेकवेळा ब्लड डोनेट कॅम्प आपल्या परिसरात राबवले.असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

माजी सरपंच संदिप मुंढे यांचा ५ आॕगस्ट वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.यावर्षी त्यांनी कोरोना पाश्र्वभूमीवर उपक्रमांचे नियोजन केले.बुधवार दि.५ आॅगस्ट रोजी वाढदिवसानिमित्ताने घरकाम करणाऱ्या पराडे आदिवासी वाडी,वरोसे पिरकटवाडी,नढाळ आदिवासीवाडी, नढाळ कुरुंगळेवाडी,नढाळ दांडवाडी,लोधिवली आदिवासीवाडी,नढाळ बौध्दवाडा येथील महिलांना किराना सामान वाटप केले.तर समविचारी दिव्यांग अपंग बचत गट यांना भांडी सेट तर कोविड १९ महामारीत जनतेला उत्तम रित्या सहकार्य केलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार,आरोग्य सेवकांना ‘कोरोना योध्दा’ प्रशस्तिपत्र देऊन सन्मान तसेच चक्रीवादलात महत्त्वाची भूमिका बजावणा-या विज अधिकारी व कर्मचारी यांना कठीण प्रसंगात उत्तम प्रकारे सेवा देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले. अशा आगल्यावेगल्या सामाजिक उपक्रमात सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करून वाढदिवस अतिशय साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे, सरपंच ताई पवार, डॉ.सौ.मते,वर्षां पाटील,माजी सरपंच कृष्णा पारंगे,माजी सरपंच सचिन तांडेल,माजी उपसरपंच दत्ता शिंदे,अरुण दलवी, समाजसेवक प्रकाश गायकवाड ,ज्ञानेश्वर पाटील, संतोष पाटील,संजय गुप्ता,संतोष मैदर्गींकर, देवीदास म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्या महानंदा मैदर्गींकर, जयश्री गोपाले,दिपक इंगळे ,बारक्या घरत,मामा कांबळे, शिवदास जगताप आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.