Press "Enter" to skip to content

अपघातात चालकासह एक प्रवाशी जखमी

अरे बापरे… एर्टीगा कार ४० फूट दरीत कोसळली : मुबंई पुणे एक्सप्रेस वे वरील घटना

सिटी बेल ∆ रायगड ∆ धम्मशील सावंत ∆

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आज दुपारी एर्टीगा कार मुबंई कडे जात असताना ती बोरघाटात (किमी ३७. ९००) ॲफकोन कंपनीच्या पुढे आली असता चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने कार सरळ ४० फूट दरीत कोसळली. या अपघातात कार मधील चालक आणि १ प्रवाशी जखमी झाले असून त्यांना तात्काळ लोकमान्य हॉस्पिटल निगडी येथे हलविण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्त टिम चे अध्यक्ष गुरूनाथ साठीलकर, बोरघाट पोलीस, आयआरबी यंत्रणा, अपघातग्रस्त टीम चे सदस्य ,देवदूत यंत्रणा, लोकमान्यची टीम तात्काळ घटनास्थळी पोहचून एर्टीगा कार मध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.