Press "Enter" to skip to content

वाघोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दीपक पवार बिनविरोध

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)

सुधागड तालुक्यातील
वाघोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तरुण तडफदार, व आंबेडकरी बहुजन चळवळीतील कर्तृत्वान अभ्यासू नेतृत्व असलेले दीपक भिमराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दीपक पवार गेली अनेक वर्षे सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रेसर राहून काम करीत आहेत. उपसरपंच दर्शना दशरथ मांढरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर दीपक पवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. दीपक पवार यांची उपसरपंचपदी निवड होताच त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.
वाघोशी ग्रामपंचायतींमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या आघाडीची सत्ता आहे. नवनिर्वाचित उपसरपंच दीपक पवार हे राष्ट्रवादीचे आघाडीचे युवानेते आहेत. सर्व बहुजन समाजामध्ये व आदिवासी बांधवांच्या श्रमजीवी वर्गाच्या उत्कर्षासाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. सुधागड तालुका बौध्दजन पंचायतीचे अध्यक्षपद ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. उपसरपंचपदाच्या निवडणुकीची सभा सरपंच अंकिता विशाल चिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपसरपंचपदासाठी दीपक पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासिन अधिकारी म्हणून सरपंच अंकिता विशाल चिले यांनी दीपक पवार यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड घोषित केली1. यावेळी उपसरपंच दर्शना दशरथ मांढरे, उत्तमराव नारायण देशमुख, सतिश रामचंद्र टक्के, किसन बापू पवार, योगिता गणेश देशमुख, सुप्रिया सचिन लटके, रेश्मा रविंद्र खेडेकर, रसिका रविंद्र देशमुख, ग्रामसेवक बी. के. टावरी, शशिकांत देशमुख, शांताराम कासार, नथु गणपत देशमुख, परशुराम सागळे, हेमंत मुजुमदार, विशाल चिले, विशाल पवार, गणेश सागळे, संतोष देशमुख, उदय देशमुख, चिंतामण पवार, महादु वाघमारे, रविंद्र खेडेकर, बाळाराम कुर्ले, उमेश तांबे, निशांत पवार, रमेश पवार, गौतम पवार, नरेश गायकवाड, प्रदीप गायकवाड, स्वप्निल गायकवाड, काशिराम जाधव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
दीपक पवार यांनी आपल्या विकासात्मक दृष्टिकोनातून आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर विकासकामे केलेली आहेत. ग्रामपंचायतीचे सदस्य नसतानाही दीपक पवार यांनी विकासकामांचा झंझावात आणला असल्यामुळे वाघोशी ग्रामपंचायतीमध्ये ते भरघोस मतांनी निवडून आले. त्यांच्या कार्याचा गौरव वाघोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करून केला असल्याच्या प्रतिक्रिया येत असून वाघोशी ग्रामपंचायतीमधूनच नव्हे तर संपुर्ण सुधागड तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दीपक पवार यांच्या उपसरपंचपद निवडीनंतर सुधागड तालुक्यातील ज्येष्ठ बौध्दाचार्य नारायण जाधव, सम्यक क्रांती विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष तथा जनता मंचचे संपादक मंगेशभाऊ वाघमारे, पत्रकार व आरपीआयचे जिल्हा सचिव रविंद्रनाथ ओव्हाळ , सामाजिक कार्यकर्ते निवास सोनावळे, सामाजिक कार्यकर्ते आतिश सागळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गीताताई पालरेचा, शेकापचे नेते व रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेशशेठ खैरे, सुधागड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन किसनराव उमटे, शेकापचे तालुका चिटणीस उत्तमराव देशमुख, चिवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय जाधव, शेकापचे जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य विठ्ठल सिंदकर, परळीचे सरपंच संदेशभाई कुंभार, परळीचे उपसरपंच महेश ठाकुर, सुधागड तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष रविंद्र जाधव, राष्ट्रवादीचे युवानेते नितिन परब यांच्यासह अनेक मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसरपंच दीपक पवार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.