Press "Enter" to skip to content

वृक्षारोपणाचा दुसरा रविवार

निसर्गाच्या राक्षणा करिता कोमनादेवी ऑक्सिजन पार्क येथे निसर्गप्रेमींची मांदियाळी

सिटी बेल ∆ उरण ∆

सारडे विकास मंच कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे उरण,साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली ,सुयश क्लासेस आवरे यांच्या संकल्पने तुन आणि सन्मानिय निर्भय म्हात्रें यांच्या सौजन्याने कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मधे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि त्याच संगोपन करत आहे. मात्र या वर्षी नवीन संकल्पना करत निसर्ग प्रेमींना वृक्षारोपण करण्यासाठी आव्हान केल गेले आहे.

निसर्गप्रेमीना यामध्ये वृक्षारोपण केल्यास त्यास संस्थेच्या मार्फ़त वृक्ष मित्र पुरस्काराने सन्मानित करत त्याला कापूर या जातीचे झाड आणि संस्थेचा निसर्ग मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दुसरा दिवस रविवार दिनांक 3 जुलै रोजी वृक्षप्रेमी साई कृपा इन्फॉर्मेशन कोप्रोली तसेच केलवणे शाखेचे विद्यार्थी वर्ग क्लासेसचे सर्वेसर्वा प्रा राकेश पाटील सर टीचर वर्ग तसेच ज्यांचा आज वाढदिवस होता असे जयेश सर , प्रा सुनिल जानकर सर सहाय्यक शिक्षक रामचंद्र विद्यालय आवरे, निसर्गमित्र हरिष म्हात्रे, सोभाग्यवती संजिवनी म्हात्रे मॅडम RES इंग्लिश मेडियम स्कूल वशेणी, सई म्हात्रें पाले आणि परिवार, निसर्गमित्र समाजसेवक शिवकुमार म्हात्रे, सोभाग्यवती दर्शना म्हात्रे मॅडम मुलगा ओक आणि परिवार आवरे , निसर्गमित्र शशिकांत ठाकूर,सिद्धेश ठाकुर केलवणे, सानिका गावंड आवरे आश्या परिवारयांच्या मार्फत वृक्षमित्र संकल्पनेचा दुसरा रविवार संपन्न झाला.

कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मध्ये येऊन त्यांनी आपल्या परिवाराची झाडांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे सदस्य सुयश क्लासेस चे निवास गावंड सर, यांनी स्वागत केलं यामध्ये सारडे विकास मंच चे ,त्रिजन पाटील,नरेश जी गावंड, श्रीवेद,दानिश, राजेश रुद्र, विभा, स्नेहीत, रिया,आदी निसर्गप्रेमी हजर होते संस्थेच्या वतीने अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी सर्वाचे आभार मानले तसेच निवास गावंड सर, राकेश पाटील सर,सुनील जानकर सर, शिवकुमार जी म्हात्रे शशीकांत जी ठाकुर यांनी सारडे विकास मंच ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.