Press "Enter" to skip to content

इंग्रजी माध्यमासाठी ग्रामीण भागात ठरत आहे आधारवड

महात्मा फुले शिक्षण संस्थेचा यशाचा चढता आलेख

सिटी बेल ∆ खांब-रोहे ∆ नंदकुमार मरवडे ∆

शिक्षण महर्षी आदरणीय रामचंद्र नानासाहेब महाडिक यांच्या अथक परिश्रमाने सन १९९२ लावलेल्या एका रोपट्याचे वटवृक्षात झालेले रूपांतर पाहताना शाळेचा प्रगतशील इतिहास काही क्षणातच डोळ्यांसमोर तरळून जातो.

शाळेची सुरुवातच मुळी भाड्याच्या खोल्यांमधून सुरू झालेली.त्यामुळे अन्य सुविधांपासून शाळेत होई सुविधा असणे हे अशक्यप्राय.तरीही कोलाड परिसरातील नागरिकांना कमीत कमी खर्चात आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकता यावे ही तळमळ उराशी बाळगून रामचंद्र महाडिक तथा काका,वाघ सर,सय्यद सर, संचालक रमेश महाडिक व यांनी सतत प्रयत्नशिल राहून एका छोट्याशा शाळेचे दोन मजली इमारतीत रूपांतर केले.

शाळेचे भविष्य उज्वल करण्यासाठीचा सुरूवातीचा काळ हा खडतर होता.अशातच मुख्याध्यापिका श्रीमती एरंडे यांनी ते एक अव्हान स्वीकारून शाळेला चांगले दिवस प्राप्त करून दिले.त्यावेळी इ.१० वीच्या वर्गाला मान्यता मिळाल्यानंतर संपुर्ण शाळेची धूरा ही मुख्याध्यापिका वैशाली महाडिक यांनी यशस्वीपणे सा़भाळून पुढील सर्व बाबी सहजरित्या पुर्ण करण्यात आल्या.

२००७_०८ या शैक्षणिक वर्षात शाळेची इ.१० वीची पहिली बॅच.या बॅचमध्ये दीपाली रोहिदास सानप या विद्यार्थ्यांनीने ८८.७६ % गुण मिळवून शाळेत पहिला क्र.पटकावला.त्यानंतर यशाचा आलेख हा सतत चढताच राहिला आहे.पुढे सन २००८-०९ या वर्षात प्राजक्ता अजय मांगडे हिने ९०.९२ % इतके गुण संपादित केले.तर २००९-१० रूझीमा रईस हाफिज ९०.००%.,सन २०१०-११ सिद्धार्थ जगन्नाथ मालुसरे,सन २०११-१२ दामिणी प्रकाश चंद्रे ९०.७३ %,सन २०१२-१३ अमोल अनिल वरणकर ९०.३५ %,सन २०१३-१४ निदा मुनाफ हाफिज ८३.२०% ,सन २०१४-१५ त्रुप्ती प्रकाश चंद्रे ९०.८० %,सन २०१५-१६ मानसी चंद्रकांत वरखले ९१.८० ,सन २०१६-१७ चंदन राजदेव सिंग ८६.८०,सन २०१७-१८ तन्मय तुकाराम धामणसे ८६,२१८,सन २०१८-१९ मानसी प्रकाश महाडिक ९१.०० %,सन २०१९-२० पूजा चंद्रकांत मोरे ९२.००%,सन २०२०-२१ हर्षल सागर मोरे ९१.००%, व त्यानंतर आलेल्या कोविड-१९ सारख्या संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या महामारीचे काळात आॅनलाईन शिक्षण प्रणाली राबवित सर्व शिक्षक व मुख्याध्यापिका वैशाली महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रुती प्रकाश शिंदे या विद्यार्थ्यांनीने ९७.६०% इतके गुण संपादित केले.

शाळेची प्रगती जसजशी वाढत होती त्या पद्धतीने शाळाही प्रगतीचे अनेक टप्पे पार करीत एका नव्या रूपात आकारास येत होती.काकांनी खोल्यांमधून सुरू केलेली शाळा आता नव्या इमारतीत स्थिरावत होती. शाळेला चारही बाजूंनी कम्पाऊंड करण्यात आले.शाळेला मोठे मैदान मिळाले.प्रत्येक वर्गात डिजिटल शिक्षण प्रणाली राबविण्यात आली.नर्सरीच्या वर्गात लहान मुलांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांच्या साहित्यांची व्यवस्था करण्यात आली.प्रत्येक विषयासाठी विषयवार शिक्षक नेमण्यात आले.तर विद्यार्थ्यी वर्गाच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शाळेतील प्रत्येक शिक्षक वेगवेगळ्या स्पर्धा व उपक्रमाचे माध्यमातून कसोसिने प्रयत्न करीत आहेत.

त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे सन २०२१-२२ या वर्षातील इ.१० वी ची बॅच कोरोना महामारीचे काळात देखील शाळेचा १००% निकाल लावला.आणि शिक्षण संस्थेला पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवून दिले. याच वर्षातील कांचन कुंदन जाधव या विद्यार्थ्यीनीने ९१.००% गुण संपादित करून शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला.तर पहिले पाच आलेले पंचरत्न म्हणजे कांचन कुंदन जाधव ९१.%,द्वितीय क्र.अंजली अनिल घोसाळकर ९०.४०%, तृतीय क्र.शर्वरी नरेश शिंदे, चतुर्थ क्र.नानासाहेब सुनील महाडिक ९०.००%,तर प़चम क्र.यश रत्नदीप म्हात्रे ८९.००% गुण संपादित केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली महाडिक यांची मेहनत व संस्थेचे अध्यक्ष रमेश महाडिक, सचिव बशिर सय्यद, उपाध्यक्ष सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या मेहनतीमुळे शाळेला मिळालेले हे यश म्हणजे शाळेच्या यशस्वी परंपरेत खोवलेला आणखी एक मानाचा तुरा !

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.