Press "Enter" to skip to content

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड यांची उपस्थिती

उरण येथे कृषी संजीवनी कार्यक्रम व PMFMF मार्गदर्शन

सिटी बेल ∆ उरण ∆ सुनील ठाकूर ∆

नुकतेच मोजे चिरनेर व मौजे बेलोंडेखार येथे कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतीपूरक व्यवसाय या विषयी शेतकरी, व महिला बचत गट यांना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रायगड श्रीमती बाणखेले मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी परसबाग बियाणे वाटप करण्यात आले. तसेच pmfme अंतर्गत कृषी प्रक्रिया युनिट ला भेट देण्यात आली‌.

महिला बचत गटाशी संवाद साधताना महिला गटांनी जास्तीत जास्त pmfme अंतर्गत नोंदणी करून अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये सहभागी होण्याचे आव्हान श्रीमती बाणखेले मॅडम यांनी महिलांना केले. यावेळी काळभोर उपसंचालक अलिबाग, तालुका कृषी अधिकारी ढवळ, मंडळ कृषी अधिकारी लोहकरे, तसेच कृषी सहाय्यक निखिल देशमुख, सुरज जाधव व विभावरी चव्हाण उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.