सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार )
गेल्या काही दिवसा पासून दडी मारलेल्या पाऊसाने सोमवारी रात्री दमदार सुरुवात करीत झोडपून काढले आहे .तर सतत पडणाऱ्या मुसळधार पाऊसा मुले कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओळणडली असून रोहे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या श्रावण महिन्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊसाने अक्षरशः दडी मारली होती.त्यामुले हा उन्हाला की पाऊसाला असा प्रश्न पडला होता.पाऊस बेपता झाल्याने मुख्यता बलिराजा चिंताग्रस्त झाला होता. दूसरी कड़े भविष्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवेल की काय याच विवंचत जनता पडली होती.परंतु सोमवारी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा दिवशी सकाळ पाऊन रिमझिम तर रात्री उशिरा पाऊसाने दमदार हजेरी लावली.हा पाऊस वाढत गेल्याने मंगळवारी कुंडलिका नदीच्या (डोलवहाल बंधारा) पाण्याच्या पातळीत वाढ होऊन या नदीने धोक्याची पातळी ओळडली आहे.रात्री १०वाजता २४.१०मि.पाऊसाची नोंद झाली असून, या वाढत्या पाण्याच्या पातळीने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर ठीक ठिकाणी पाणी रस्त्यावर साचल्याने रोहे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.






Be First to Comment