सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
रायगड किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन आगरी संस्था खांदा कॉलनी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील ५६५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
यावेळी स्पर्धेसाठी महाड, माणगाव, खालापूर, कर्जत, पेण, पनवेल, अलिबाग आदी ठिकाणांहून स्पर्धंक सहभागी झाले होते. रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आणि वाको महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनचे सचिव निलेश भोसले यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत रसायनीतील प्रशिक्षक संजय पाटील यांच्या संघातील तेरा विद्यार्थ्यांनी किकबाॅक्सिंग स्पर्धेत शानदार कामगिरी करून गोल्ड मेडल पाच, सिल्व्हर मेडल दोन,ब्रांझ मेडल सहा पदक जिंकले.यात किकबाॅक्सिग स्पर्धेत विनायक संजय पाटील, अर्जुन विशाल जाधव, ज्ञानेश्वर लक्ष्मण कदम,अनुसया लक्ष्मण कदम, प्रांजळ प्रशांत धुमाळ यांनी गोल्ड पदक मिळविले.तर जान्हवी बाळकृष्ण आगज आणि वरद संजय पाटील यांना सिल्व्हर पदक तसेच स्वराज रामदास काठावले, स्वरूप सदाशिव पाटील, धनंजय शिवाजी अहिरे,भावार्थ प्रशांत धुमाळ, ऋषी कुमार कृष्णकुमार पनिरीया व ऋषभ नरेश मोरे यांनी ब्रांझ पदक पटकावले.
किकबाॅक्सि़ग स्पर्धेत विजय संपादन केलेल्या तेरा विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक संजय पाटील यांनी अभिनंदन केले.सदर स्पर्धेचे वाको महाराष्ट्र किकबॉक्सिंग अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी कौतुक करत रायगड जिल्ह्यातील किकबॉक्सिंग खेळाच्या प्रचार प्रसाराचे अभिनंदन केले आहे.
Be First to Comment