सर्व विषयात ३५ गुण प्राप्त करत झाला मॅट्रिक पास : आदिवासी समाजात कौतुक
मुबंई बोर्डाकडून होणार सत्कार
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या शालांत इयत्ता दहावीची परीक्षा मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेचा एस. एस. सी. बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन या परीक्षेत घोसाळे भालगाव विभागातील मुचने आदिवासी वाडीवरील आपल्या आई वडिलांसमवेत दररोज मोल मजुरी करत शिक्षण घेत असलेला कु.अक्षय बाब्या मुकण हा आदिवासी विद्यार्थी सर्व विषयात ३५ मार्क मिळवत ३५% गुण मिळवून झाला मॅट्रिक पास त्यामुळे रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात हा दुसरा चमत्कार आहे. अक्षयच्या या विशेष चमत्काराबद्दल मुंबई बोर्डाकडून त्याचा सत्कार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गेली दोन महिन्यापासून सर्वांचे लक्ष वेधून राहिलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.यामध्ये कु अक्षय बाब्या मुकण यांनी प्रत्येक विषयात ३५ गुण तर ५०० पैकी १७५ गुणांची आकडेवारी घेत एकूण ३५% गुण संपादित करून संपूर्ण रायगड जिल्ह्यात हा चमत्कार केला आहे अक्षय हा मुबंईकर ग्रामस्थ मंडळ भालगाव या संस्थेचे कै द.ग.तटकरे माध्यमिक विद्यालय विरजोली रोहा या शाळेचा विद्यार्थी असुन त्याला शाळेचे मुख्याध्यापक विनय मार्गे, शिक्षक अडसूळ, गाडे, देवळेकर, पाटील सर, घाग, निलेश व पांडुरंग आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.
अक्षयची आई वडिलांबरोबरची मोल मजुरी शिक्षणात प्रगती
आपल्या वडिलांबरोबर मोल मजुरी करत शिक्षण घेत इयत्ता दहावीच्या परीक्षेत केवळ ३५% टक्के गुण मिळवून पास झालाअसला तरी त्याचे सर्व विषयातील ३५–३५ गुण हे चमत्कार ठरत असून या विद्यार्थ्यांचा थेट सत्कार मुबंई बोर्डाकडून होणार असल्याचे समजते.त्याच्या या यशस्वीरित्या कामगिरीबद्दल विरजोली घोसाळे विभागीय पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी विशेष कौतुक केले. तसेच विद्यालयाचे चेअरमन जगन्नाथ कुंडे, शाळा समिती सदस्य मारुती नाकती, जनार्दन जामकर, गणेश ठाकूर,हरिश्चंद्र धुमाळ, संजय नाकती, एकनाथ पैर, राजेंद्र कुंडे, संदीप जामकर, सौ अंजली कुंडे, तसेच सर्व ग्रामस्थ व शिक्षक व कर्मचारी वृंदानी त्याचे कौतुक करत त्याला शुभेच्छा व पुढील वाटचालीस सदिच्छा मिळत आहेत.






Be First to Comment