Press "Enter" to skip to content

आमदार महेंद्र दळवींच्या समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

आमदार महेंद्र दळवींचे समर्थक उतरले रस्त्यावर : शिवसैनीकांनी दिला शिंदेंच्या बंडाला पाठिंबा

गुहावटी येथे गेलेले आमदार हे बंडखोर नसून निष्ठावंत शिवसैनिक :- मानसी दळवी

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆

धर्मवीर आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाहित आमदार महेंद्र दळवी यांच्यासाहित जिल्हयातील आमदार सहित महाराष्ट्रातील इतर आमदार हे गुहावटी येथे गेले आहेत.म्हणून त्या सर्वांना बंडखोर ठरविले जात आहे मात्र हे सर्व बंडखोर नसुन निष्ठावंत शिवसैनिक आहोत,असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेच्या सेनेच्या माजी गटनेत्या मानसी दळवी यांनी अलिबाग रेवस बाह्यवळण येथील आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यालयाजवळ आमदार महेंद्र दळवी सहित रायगड जिल्हयातील आमदार यांच्या समर्थानात आयोजित मेळाव्यात केले.

यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी गटाचे तालुका प्रमुख राजा केणी,मुरूडचे माजी तालुका प्रमुख निलेश घाटवळ,मुरूड संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत बेलोसे,रोहा येथील उस्मान रोहेकर, शुभांगी करडे,संतोष निगडे यांच्या असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मानसी दळवी यांनी सांगितले की,रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असूनसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक आमदार असूनसुद्धा त्यांना पालकमंत्री पद देण्यात आले.हे चुकीचे आहे.मात्र आम्ही आमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले असल्यामुळे आम्ही निमूटपणे सहन केले.मात्र रायगडच्या पालकमंत्री यांनी प्रत्येकवेळी,प्रत्येक कामात शिवसेना नेत्यांना सहित आमदार यांना डावलण्यात येऊ लागले.निधी देताना हात आखडता घेणे.पालकमंत्री होऊन तीन वर्षे झाली तरी आद्यपही शासकीय कमिटीची पदे वाटप करण्यात आले.नियोजन निधी मध्ये आम्हाला डावळणे आदी अनेक गोष्टी आहेत त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे.रायगड जिल्हयातील आमदार भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे यांच्या बैठकी ह्या आमच्या निवासस्थानी होत असत. यावेळी त्यांच्यावर पालकमंत्री यांच्याकडून होणारा उद्रेक बाहेर पडत असत.त्याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली मात्र त्याबाबत कोणत्याही प्रकारची दखल ही घेतली नाही.रश्मी ठाकरे यांचाही मला फोन आला होता यावेळी त्यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यातील आमदार यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का मात्र त्यावेळी मी सांगितले की त्यांच्यावर होणारे अन्याय यांच्यातून ही घटना घडली आहे.

यावेळी राजा केणी यांनी सांगितले की,महाविकास आघाडी ही अस्तित्वात आल्यापासून आणि रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला गेले तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेवर कुरघोडी करीत सेना ही कशाप्रकारे जिल्ह्यातुन बाद होईल यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते.प्रत्येक भूमिपूजन,उद्घाटन वेळी शिवसेनेचे आमदार ,पदाधिकारी यांना जाणीवपूर्वक डाळवणे आदी प्रकार सतत घडू लागले.

तर रोहयाचे उस्मान रोहेकर यांनी सांगितले की, ज्या पक्षाचा अध्यक्ष शरद पवार यांनी 1978 मध्ये पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले त्याचप्रमाणे ज्यांना रायगडमध्ये मोठे केले त्या अंतुले यांच्या पाठीत विद्यमान खासदार यांनी खंजीर खुपसले आहे.आणि आणत प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या नावाने मते मागितली जातात.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.