Press "Enter" to skip to content

जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

प्रतिनिधी आवरे( प्रो प्रशांत म्हात्रे )

आत्माराम ठाकूर मिशन संचलित आवरे येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

श्री अंबिका कुटीर योग या संस्थेच्या मार्फत योग प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखवून विद्यार्थ्यांन कडून करून घेण्यात आली. यात ताडासन ,वृक्षासन, चंद्रासन ,त्रिकोणासन, वीरभद्रसन, दंडासन , कपालभाती ,प्राणायम, सूर्यनमस्कार ,मयुरासन, व अशा सारखी विविध प्रात्यक्षिकेही विद्यार्थ्यांनि केली.

श्री अंबिका कुटीर योग मिशन चे श्री उत्तम पवार सर श्री संजय भोंसले सर हे विवीध असनाच्या सुचने प्रमाणे प्रणित पुजारी सर कल्पना क्षीरसागर मॅडम रोहिणी भोंसले मॅडम हे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखवत व विद्यार्थी करत असत सदर कार्यक्रम हा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील क्रीडाशिक्षक शुभम ठाकूर सर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे मॅडम विद्यालयातील शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहकारी शिक्षक अनिल पाटील सर यांनी केले सदर प्रात्यक्षिक योग शिबिरासाठी जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल विद्यालयातील विद्यार्थी वर्ग हा मोठ्या संख्येने उपस्थित होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.