Press "Enter" to skip to content

जागतिक योग दिनानिमित्त सेक्टर 6 मधील राधाकृष्ण मंदिरात योगा कार्यक्रम संपन्न

कळंबोली: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राधाकृष्ण मंदिर, सेक्टर 6 येथे भव्य योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम स्थायी समितीचे सभापती बबन मुकादम यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे, भाजपा भटके विमुक्त मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, महिला आघाडीच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा प्रिया मुकादम तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी योग प्रशिक्षक संतोष काशीद व विजय पांडे यांनी उपस्थित नागरिकांना विविध आसने व प्राणायामाचे सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व विशद करत सर्वांनी नियमित योगा करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, महिला व तरुणांनी सहभाग नोंदवला. शेवटी सर्वांनी सामूहिक सूर्यनमस्कार करून कार्यक्रमाची सांगता झाली.

स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांनी उपस्थितांचे आभार मानले व अशा आरोग्यवर्धक उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सुरू राहणार असल्याचे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.