Press "Enter" to skip to content

तन्ना परिवार व लोहाणा समाज आयोजित आरोग्य शिबीर संपन्न

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

खोपोली चे प्रथम नगराध्यक्ष गो .पु .तना व मित्रपरिवार ,लोहाणा समाज तसेच लायन्स क्लब खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने लोहाणा समाज येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरात एकूण ३०८ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

सकाळी दहा ते पाच या दरम्यान टाटा मेमोरियल सेंटर यांच्या सहकार्याने कर्करोग तपासणी करण्यात आली, यात तोंडाचा कॅन्सर, स्तन ,तसेच गर्भाशयाचे मुख कॅन्सर तपासणी (महिलांसाठी) करण्यात आली ,या शिबिरात १०७ जणांनी भाग घेतला.

समर्पण ब्लड बँक खोपोली यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले, यात ६८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

लायन्स क्लब च्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शिबिरात १३३ जणांनी नेत्र तपासणी केली.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तना मित्र परिवाराचे अभय तना, तसेच दिनेश मुसळे, नितीनभाई मनियार, लायन्स क्लबचे महेश राठी, विकास नाईक, खेमंत टेलर, शैलेश विठलानी, राजेश आभाणी, केतन पोपट ,रसिक मजेठीया, मनीष ठक्कर याप्रमाणे अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.