Press "Enter" to skip to content

जोहे हायस्कूलचे प्राचार्य भाऊसाहेब सांगळे सेवानिवृत्त

विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देऊन त्यांची प्रगतीकडे वाटचाल करणारे प्राचार्य सांगळे — अभयकुमार साळुंखे

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

पेण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज जोहे या प्रशाळेचे प्राचार्य भाऊसाहेब सांगळे हे सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सन्मान श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलतांना अभयकुमार साळुंखे म्हणाले की विद्यार्थी हा मातीचा गोळा आहे त्याला घडविण्याचे काम शिक्षकवर्ग करीत असतो.त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना शिस्तीचे धडे देऊन त्यांची प्रगतीकडे वाटचाल करून देणारे प्राचार्य भाऊसाहेब सांगळे आहेत. त्यांनी या शाळे करीता अतिशय मेहनत घेऊन येथे दोन मजली इमारत उभी केली असल्याचे समाधान आम्हाला वाटले असल्याचे त्यांनी सांगितले.तर येथील सर्व स्कुल कमिटी, शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थ यांचे चांगले सहकार्य लाभले असून यामुळे आपल्याला एवढे वर्षे आपल्याच कुटुंबात राहिल्या सारखे जाणवत होते. यापुढे शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी एक पाऊल पुढे जाऊन शिक्षणाचे धडे द्यावे असे सांगून या शाळेच्या इमारती करीता आपण १ लाख रुपये देत असल्याचे प्राचार्य भाऊसाहेब सांगळे जाहीर केले.

यावेळी संस्थेचे कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, आजिव सेवक प्रकाश हाके, संस्थेचे निरीक्षक संजय महाजन, निरीक्षक सुरेश बेडगे, रायगड निरीक्षक सुरेश पाटील, स्कुल कमिटी अध्यक्ष अशोक मोकल, पेण कॉलेजचे प्राचार्य दुधाळे, साई कॉलेज प्राचार्य आर.के.पाटील, गडब निरीक्षक टी.बी.मोकल, सरपंच जयवंती पाटील, जोहे शाखेचे सदस्य डॉ.अनंत पाटील, काशिनाथ पाटील, रामदास पाटील, नितीन मोकल, देवा पेरवी, गोपीनाथ मोकल, शंकर मोकल, लवेंद्र मोकल, लहू पाटील आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.