सिटी बेल ∆ तृप्ती भोईर ∆ उरण ∆
उरण तालुक्यातील नवघर येथील बस स्थानकानजीक असलेल्या झोपडपट्टीत उरण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संग्राम तोगरे व त्यांच्या पत्नी हे नेहमीच गरजुंपर्यंत जिवनावश्यक सामन,व कधी औषधे वाटप करीत असतात .
या त्यांच्या उदार व दानशूरतेचा प्रत्यय आज नवघर बस स्थानका नजीक असलेल्या मोलमजुरी करणा-या आजुबाजुच्या गावांतील किंवा रस्त्यांची मोठमोठी कामे चालली आहेत अशा ठिकाणी जाऊन मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना आला.
झोपडपट्टी मध्ये जाऊन स्वता हे दोघे उभयतां व त्यांचे सोबत असलेले सहकारी यांनी अन्नधान्य,बिस्कीटे तर श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण या संस्थेच्या अध्यक्षा रायगड भूषण सौ. संगीता ढेरे यांच्या कडुन लहान मुलांसाठी ज्युसची पाकीटे , सोबतच कपड्यांचेही वाटप करण्यात आले.
संग्राम तोरगे दा़ंपत्य नेहमीच अशा कार्यातुन आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करीत असतात.यावेळी रायगड भुषण प्रा. एल.बी पाटील, मोहन भोईर,नितीन मढवी, रत्नाकर चोगले, प्रदिप चौगले, सुमन तोगरे,वैशाली जाधव, संगीता ढेरे,तृप्ती भोईर यांच्या सहीत त्यांचे सहकारी तसेच मोलमजुरी करणारे कामगार उपस्थीत होते.
यावेळी संग्राम तोगरे बोलताना म्हणाले की, जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा असून मी माझ्या परीने सातत्याने या माझ्या गरिब गरजू तसेच मोलमजुरी करणा-या कामगारांना मला जमेल तसं औषधे,अन्न,धान्याचे वाटप करत असतो आणि यापुढेही असेच चालू ठेऊन मी माझे या मोलमजुर कामगारांच्या प्रती असणारी बांधीलकी जपत राहीन.







Be First to Comment