Press "Enter" to skip to content

कॅप क्लबतर्फे श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट चषकाचे आयोजन

सिटी बेल ∆ पनवेल ∆

पनवेलमध्ये प्रथमच टर्फ ग्राउंडवर कॅप क्लबतर्फे श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी याठिकाणी असलेल्या टर्फ ग्राउंड याठिकाणी कम्युनिटीतील लोकांसाठी प्रथमच अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या क्रिकेट सामन्यांमध्ये मराठा, मुस्लिम, सिंधी, मारवाडी जैन, बोहरी समाज, लोहाणा गुजराथी, माहेश्वरी कच्छी, कच्छी जैन, ख्रिश्चन आदी समाजाने सहभाग घेतला आहे. सदर क्रिकेट सामन्यांचे आयोजन २६ जून २०२२ रोजी करण्यात आले असून या स्पर्धेत विजेत्या संघास रोख रक्कम १० हजार व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. नोंदणी करण्यासाठी ऍड. मनोहर सचदेव ७२७६६६६६६६, मनोज देढिया ९३२३६६६६६६, काजल देढिया ९८३३२४७५६५

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.