सावित्री नदी धोक्याच्या पातळीवर
सिटी बेल लाइव्ह / राजेश बाष्टे / अलिबाग #
रायगड जिल्ह्याला मुसळधार पाऊस झोडपून काढतोय. मुसळधार पाऊस कालपासून सुरुच आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसाने सोमवार रात्री्पासून हजेरी लावली.
मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असला तरी महाबळेश्वर आणि प्रतापगड या घाट माथ्यावर जोरदार पाऊस झाल्याने त्याचा परिणाम महाड तालुक्यातील सावित्री तसेच गांधारी या नद्यांवरती झाला आहे.
आज सकाळी महाड शहरात पुराचे पाणी घुसले आहे. अनेकांची तारांबळ उडालेली दिसून येत आहे. असाच पावसाचा जोर राहिला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.असे मिलिंद शिरगावकर सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक यांनी सांगितले









Be First to Comment