जे एम म्हात्रे चँरिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल, वेश्वी शाळेची 100% निकालाची परंपरा सलग चौथ्या वर्षीही कायम
सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
जे.एम.म्हात्रे चारिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल,वेश्वी शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा 2021-22 वर्षाचा एकूण निकाल सलग चौथ्या वर्षीही 100 % एवढा लागला. कुमारी सिमरन विलास मुंबईकर 88.40% गुण मिळवून प्रथम तर कुमारी सलोनी समीर पाटील 88.00% गुण मिळवून द्वितीय तसेच कुमारी श्रेया रणधीर घरत 87.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
शाळेच्या एकूण निकालामध्ये 21 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 32 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवून घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे.एम.म्हात्रे, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रितम शेठ म्हात्रे , संस्थेचे सचिव जे.के मढवी ,शाळा समितीचे चेअरमन चंद्रकांत मुंबईकर,शाळेचे मुख्याध्यापक प्रितम टकले यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







Be First to Comment