सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
रसायनी रिस परिसरात गेल्या पंधरा दिवसांपुर्वी महिलांकरिता कॅन्सर प्रतिबंध व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कर्करोगावरील व्याख्यानाचा महिला वर्गाने लाभ घेतला.
यासाठी कर्करोग प्रतिबंध योजनेचा परिसरातील महिलांना लाभ मिळावा,तसेच पुढील उपाययोजना करता याव्यात यासाठी पंचायत समिती माजी सभापती कांचन कृष्णा पारंगे आणि संवेदना डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन रिस भटवाडी अंगणवाडीत करण्यात आले होते.

यावेळी पंचायत समिती माजी सभापती कांचन पारंगे यांच्याहस्ते फित कापून तर देविदास म्हात्रे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून शिबिराला सुरुवात करण्यात आली.यावेळी संवेदना फाउंडेशनच्या मोहिनी बागडे यांनी उपस्थित महिला वर्गाला सहकार्य केले. कर्करोग शिबिराला परिसरातील महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला.
या आजारपणामध्ये महिलांसाठी प्रतिबंध उपाय व मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले .या शिबिरात महिलांची सत्नाचा कर्करोग,गर्भांशयाचा,तोडांचा कर्करोग आदी तपासणी करण्यात आली .
यावेळी तज्ञ डॉक्टर प्रतिभा पाटील कर्करोग प्रतिबंधक विभाग खोपोली , डॉ. प्रियांका आखाडे, डॉ.सुप्रिया मांगुळकर -मेडिकल सोशल वर्कर, अशोक पाटील , विघ्नेश मुसले, किरण शिंदे, प्रियंका पाटील,हर्षदा भितले, सपना नाखले, आरोग्यसेविका मनीषा जाधव ,आरोग्यसेविका अर्चना कुंभार, नम्रता कुंभार, आलेख बडगे ,दर्शंना महाडिक,पूनम मांडवकर,सविता पाटील यांनी कर्करोग तपासणी साठी आलेल्या महिलांना सहकार्य केले.या दोन दिवशीय शिबिराचा शनिवारी जवळपास दोनशे पेक्षा अधिक महिलांनी तपासणी केली.

यावेळी माजी सभापती कांचन पारंगे,माजी सभापती वृशाली पाटील, उपसरपंच माधुरी जांभळे,मा उपसरपंच श्वेता कांबळे,दिप्ती म्हात्रे, दिपाली म्हात्रे, राजश्री जांभळे, उर्मिला डवले, लता म्हस्कर,स्वाती वाघे, सुप्रिया गायकर,रसिका पारंगे, अश्विनी मुंढे , नलिनी पाटील, लक्ष्मी जांभळे,माजी सरपंच कृष्णा पारंगे,श्याम म्हस्कर, प्रकाश पाटील, देविदास म्हात्रे, विनायक डवळे, जयंता पाटील, दिनकर पारंगे, हरि राठोड आदीसह रिस परिसरातील नागरिक उपस्थित होते.सदर शिबिराला युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भेट देऊन माजी सभापती कांचन पारंगे यांचे आभार मानले.







Be First to Comment