Press "Enter" to skip to content

उनपाचे मुख्याधिकारी तावडे यांची बदली


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) #

उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची बदली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झाली आहे.
मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी उरण नगरपालिकेचा पदभार २ वर्षांपूर्वी स्विकारला होता. त्यांनी आपल्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत सहकाराची भूमिका ठेवत सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न केला आहे. काल अचानक त्यांची पुणे येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत बदली झाल्याचे वृत्त आले. उरण नगरपालिकेत त्यांनी सर्वांच्या
समस्यां जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे कामगार नेते संतोष पवार यांनी त्यांना निरोप देताना केलेल्या सत्कारप्रसंगी सांगितले. नगरपालिकेमधील सर्व कामगार कर्मचारी अधिकारी यांच्यामधील गुण ओळखून कामाची जबाबदारी वाटप केल्यामुळे दोन वर्ष उरणमध्ये नागरीकांना उत्तम सेवा मिळाली या कालावधीत समाधान व्यक्त केले आहे.मुख्याधिकारी तावडे यांना नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यावेळी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.