सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप येथे आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये 167 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच 32 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे निदान करण्यात आले.
या शिबिराकरिता तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद रोकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा पाईकराव, डॉ.वामशी कृष्णा हे उपस्थित होते.







Be First to Comment