सिटी बेल लाइव्ह / अरुणकुमार जैन /मुरूड #
मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेेते,माजी तालुका चिटणीस, माजी जि.प.सदस्य राम जानू बंदरी उर्फ तात्या (वय 63) यांचे कोरोनाची लागण झाल्याने दुःखद निधन झाले.चारच दिवसांपूर्वी आरोग्य तपासणीत ते कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतानाही त्यांचे निधन झाले.अलिबाग येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राम बंदरी हे शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते,नेते होते.राजकीय,सामाजिक क्षेत्रात त्यांचा सातत्याने वावर होता.मुरूड तालुक्यातील सुरई,(बोर्ली )येथे जन्मलेल्या बंदरी यांनी उसरोली जिल्हा परिषद मतदार संघाचे सन2002 ते2007 पर्यंत प्रतिनिधीत्वही केलेले आहे.शिवाय मुरुड तालुका शेकाप चिटणीसपदावरही ते 13वर्षे कार्यरत होते.सध्या ते मुरुड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या निधनाबद्दल शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील,माजी आमदार पंडित पाटील,जिल्हा चिटणीस अॅड.आस्वाद पाटील,तालुका चिटणीस,नगरसेवक मनोज भगत,माजी जिल्हा परिषद सदस्य वामन चुनेकर यांनी शोक प्रकट करुन आदरांजली वाहिली.मनोज भगत यांनी बंदरी यांच्या निधनाने पक्ष एका निष्ठावंत कार्यकर्त्याला कायमचा मुकला असल्याची भावना व्यक्त केली.राम बंदरी विरोधक म्हणून असले तरीही त्यांनी गावाच्या विकासासाठी कधीही विरोध केला नाही. ते विरोधक पेक्षा जवळचे मित्र अधिक होते.असे बोर्ली सरपंच नौशाद दळवी यांनी शोक व्यक्त करताना केले.
राम बंदरी यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून,नातवंडे असा परिवार आहे.






Be First to Comment