सिटी बेल ∆ खांब-रोहे ∆ नंदकुमार मरवडे ∆
रोहे तालुका धाटाव औद्योगिक वसाहतीमधील नामांकित कोरस इंडिया लिमिटेड कंपनीतील कामगारांच्या आरोग्याच्या द्रुष्टीने दि.२१,२२ व २३ जुलै रोजी तीन दिवसीय मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
कंपनी कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत आपल्या शरीराचा अतिशय महत्वाचा घटक असलेल्या डोळ्यांची नेत्र तपासणी शिबिर कोरस इंडिया कंपनीतील माजी कामगार खेळू पांडुरंग वारंगे व त्यांचे सुपुत्र
निलेश वारंगे तसेच कंपनी व्यवस्थापन यांच्या विशेष सहकार्याने सदरचे शिबिर रोज सकाळी सकाळी 9.30 वाजता कोरस कंपनीत आयोजित केले आहे.यासाठी नेत्रोदय ऑप्टीशियनचे डॉ.प्रवीण शिरोडे ,घाटकोपर मुंबई यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे तरी कोरस कंपनीतील सर्वच कामगारांनी आपले डोळे तपासून घेण्याचे आवाहन कंपनी व्यवस्थापनाने केले आहे.







Be First to Comment