पहा लोकसेवेसाठी परदेशातील ऐश्वर्य सोडणारे डॉ.अभितेज म्हस्के यांच्याशी थेट संवाद
सिटी बेल ∆ पनवेल ∆
पनवेलच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मधले एफ आर सी एस ऑर्थो असणारे डॉ अभीतेज म्हस्के यांची कारकीर्द प्रेरणादायी आहे.नवी मुंबई,रायगड सह संपूर्ण कोकण पट्ट्यात अभितेज एकमेव एफ आर सी एस ऑर्थोपेडिक सर्जन आहेत.एफआरसीएस हा मुळात अत्यंत खडतर अभ्यासक्रम आहे. ऑर्थोपेडिक क्षेत्रातील ती सर्वोच्च डिग्री आहे. याशिवाय डॉक्टर अभीतेज म्हस्के यांनी जॉइंट रिविजन फेलोशिप सुद्धा मिळविली. सुरुवातीला नऊ वर्ष आयर्लंड मधील डब्लिन आणि त्यानंतर लंडन मधील सुप्रसिद्ध रॉबर्ट जोन्स हॉस्पिटल येथील सुपर कन्सल्टंट म्हणून काम केल्यानंतर डॉक्टर अभीतेज यांनी मायदेशी प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला. आपल्या शिक्षणाचा देशबांधवांना फायदा झाला पाहिजे या उदात्त भावनेने ते मायदेशी परतले.
डॉक्टर आभीतेज मस्के यांचे आजोबा म्हणजे तीन वेळा आमदार असणारे काकासाहेब म्हस्के. नवी मुंबई मधील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निर्माते अशी काकासाहेब म्हस्के यांची ख्याती आहे. अहमदनगर येथे म्हस्के कुटुंबीयांचे स्वतःचे मेडिकल कॉलेज आहे, फार्मसी कॉलेज सुद्धा आहे. डॉ. अभितेज सहज एक शिक्षण संस्था चालक म्हणून मिरवू शकले असते. परंतु रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आणि ती सगळ्यात मोठी समाजसेवा या भूमिकेतून ते आज सेवा देत आहेत.
डॉक्टर अभितेज त्यांनी आजपर्यंत पाच हजारहून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. हिप आणि नी रिप्लेसमेंट तज्ञ म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरत आहे. गरजवंताकडून पैसे घेऊ नको,पण त्याची व्याधी बरी करून दे असे त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांना संस्कार प्राप्त झाले आहेत. लाईफ लाईन व्यतिरिक्त एम.जी.एम. वाशी,अपोलो,रिलायन्स येथेदेखील डॉक्टर अभितेज कार्यरत आहेत.








Be First to Comment