राममंदिराचा भूमीपूजनाचा सोहळा उत्साहात आणि आनंदात; मात्र शासनाचे सर्व नियमांचे पाळण करून साजरा करा !
सनातन संस्थेने केले आवाहन
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
रामजन्मभूमी 500 वर्षे राममंदिर उभारण्याच्या प्रतीक्षेत आहे. दैवी योजनेनुसार तो परमांनदाचा क्षण जवळ आला आहे. या भव्य ईश्वरी कार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी आपल्याला मिळत आहे, यासाठी हा ऐतिहासिक क्षण उत्साहाने आणि आनंदाने; मात्र शासनाने कोरोना महामारीच्या संदर्भात सांगितलेले सर्व नियमांचे पालन करून साजरा करावा.श्रीरामाच्या जयघोषात 5 ऑगस्ट रोजी संपन्न होत असलेला हा भूमीपूजन सोहळा राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यासाठी प्रत्येक रामभक्ताने पुढील कृती कराव्यात अशी आवाहनात्मक माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी दिली.
प्रत्येक हिंदूने आपल्या घरावर भगवा ध्वज लावावा ,घरासमोर श्रीरामतत्त्वाची सात्त्विक रांगोळी काढावी,सकाळी श्रीरामाची पूजा करतांना तेलाचा दिवा लावावा, तसेच संध्याकाळी दाराजवळ पणत्या लावाव्यात.
कुटुंबातील सर्वांनी मिळून सामुहिक श्रीरामरक्षास्तोत्र पठन करावा,दिवसभर सर्वांनी अधिकाधिक वेळ ‘श्रीराम जय राम जय जय राम’ तसेच राम कृष्ण हरी हा नामजप करावा,‘श्रीरामाला अपेक्षित असे आदर्श रामराज्य लवकर स्थापित होवो’, अशी श्रीरामाला सद् भावनेने प्रार्थना करावी ,तसेच अशा विविध कृतींद्वारे श्रीरामाची भक्ती करत प्रभु श्रीरामाची कृपा संपादन करा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने प्रवक्ते राजहंस यांनी सर्व भक्तगण व हिंदु समाजाला केले आहे.






Be First to Comment