सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
मुंबई – गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील सुकेळी खिंडीत बुलेट मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार दशरथ काशिनाथ सुरते (वय ५३) रा. ओ.एन.जी.सी. कॉलनी, पनवेल हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि. ४) सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास सुकेळी खिंडीतील नागोठणे बाजूच्या उतारावर घडला.
याबाबत उपलब्ध झालेल्या माहिती नुसार मुंबई गोवा महामार्ग क्र. ६६ वरील सुकेळी खिंडीतील नागोठणे बाजूकडील उतारावर बुलेट मोटारसायकलस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी घसरुन ते रस्त्यावर पडले. या अपघातात मोटारसायकल स्वार दशरथ काशिनाथ सुरते हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे प्रथमोपचार करून रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी पुरोहित हॉस्पिटल पनवेल येथे नेण्यात आले आहे. या अपघाताची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन नागोठण्याचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस पुढील तपास करीत आहेत.






Be First to Comment